जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळवाडी (पांगरी तर्फे मढ)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळवाडी (पांगरी तर्फे मढ) येथे नुकतीच दौऱ्यावर असताना भेट दिली. शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मराठी- इंग्रजी भाषेतील उत्तम संवाद कौशल्य, Body Parts, भारताचे संविधान, आणि 35 पर्यंतचे पाढे मुखोद्गत असल्याचे पाहून आनंद वाटला. मुख्याध्यापक श्री. संजय डुंबरे व उपाध्यापिका श्रीमती मेघा डुंबरे यांनी विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्तम पद्धतीने अध्ययन करून घेतल्याचे जाणवले. बीडीओ@जुन्नर                            …

0 Comments

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर  विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर (जन्म : इ.स. १९३५; - इ.स. २००२) ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महिन्यात पंढरपूर येथे झाला. विठाबाईना नृत्याची आवड होती. त्यांच्या बहिणी रमाबाई व केशरबाई यांच्या मार्गदर्शनखाली विठाबाई लावणीनृत्य करण्यात तयार झाल्या. आळतेकर, मामा वरेरकर, यांच्या कलापथकात विठाबाई प्रथम नोकरी करीत होत्या.[१] तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगलाताई यांचा तमाशा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील देवदहिफळ…

0 Comments

नारायणगड – ( जुन्नर )

प्रस्तावना नारायणगड हा जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावजवळ राष्ट्रीय महामार्ग ६०च्या पूर्वेला आहे. या गडावर पुरातन लेणे व पाण्याची टाके आहेत. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. खोडद गावाच्या उत्तरेला " नारायणगड " आहे. त्याच्या कुशीत गडाचीवाडी नावाची वस्ती वसलेली आहे. नारायणगड हा किल्ला किल्ल्यांच्या तीनप्रकारापैकी गिरिदुर्ग या प्रकारा मध्ये समाविष्ट होतो. पुणे जिल्ह्या मध्ये पुणे – नाशिक महामार्ग वर पुणे शहरा पासून ९० कि.मी अंतरा वरील नारायणगाव या गावा पासून पूर्वेस १० कि.मी अंतरवर माळवाडी (खोडद) तेथून उत्तरेस साधारण४…

0 Comments

किल्ले शिवनेरी- (जुन्नर )

प्रस्तावना शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा…

0 Comments

नाणेघाट

नाव नाणेघाट उंची २७२४ फूट प्रकार गिरीदुर्ग चढाईची श्रेणी मध्यम ठिकाण ठाणे जिल्हा, महाराष्ट्र जवळचे गाव वैशाखरे डोंगररांग हरिश्चंद्राची रांग सध्याची अवस्था व्यवस्थित सातवाहन काळातील घाटमार्ग नाणेघाट                                      नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला.…

0 Comments