पंचायत समिती जुन्नर येथे आज स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा असणारा शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री. सचिन सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्यध्वज बांधण्यात आला. त्यावर सुवर्णकलश बांधून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी हे शब्द अष्टगंधाने उमटविण्यात आले. त्यावर पुष्पहार, गाठी आणि आंब्याची डहाळी बांधून शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त माध्यमाने व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ खोडद अंतर्गत मौजे खोडद येथे दिनांक २५/०५/२०२३ रोजी वंध्यत्व तपासणी,जंत निर्मूलन,गोचीड गोमशा निर्मूलन व उपचार शिबीर घेण्यात आले. तसेच पशुपालकांना चारा पिके बियाणे व औषधे वाटप करण्यात आले. डॉ.महेश शेजाळ,पविअ(वि),डॉ.शरद लोंढे,पविअ, रांजणी यांनी पशुपालकांना मुरघास पशुपालन,मुक्त संचार गोठा व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना बाबत मार्गदर्शन केले.* *पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ खोडद शिवजयंती २०२४ पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती जुन्नर येथे चित्र कला स्पर्धेचे उद्घाटन करताना मा. श्री. हेमंत गरिबे साहेब व इतर शिक्षक रुंद व पंचायत समिती जुन्नर चे अधिकारी वर्ग व काही क्षणचित्रे चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करताना मा. गटविकास अधिकारी शरदचंद्रजी माळी साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते शिवजयंती निमित्ताने नियोजन बैठक घेताना मा. तहसीदार साहेब व गटविकास अधिकारी साहेब व इतर विभाग प्रमुख आय एस आय अधिकारी मा.शाम वर्धने साहेब यांचे श्री क्षेत्र ओझर याठिकाणी स्वागत करताना मा. गटविकास अधिकारी शरदचंद्रजी माळी साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते शिवजयंती निमित्ताने नियोजन बैठक घेताना मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब इतर विभाग प्रमुख पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता श्रीमती राहीबाई पेरे यांनी आज आपल्या स्टॉलला भेट दिली ग्लोबल कृषी जिल्हा कृषी महोत्सव प्रसंगी उद्घाटन नकरताना गटविकास अधिकारी व इतर मान्यवर गटविकास अधिकारी शरदचंद्र य.माळी साहेब यशदा पुणे येथे ट्रेनिंग देताना Prev 1of4 Next